Wednesday, 28 January 2015

सावळज ग्रामपंचायत निवडणुक 2015

सावळज ब्रेकिंग
=================
50% महीला आरक्षणामुळे अनेक दिग्गज इछुकांचे पत्ते कट ?
-------------------------------------------
सावळज ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण घोषीत

सावळज /मिलिंद पोळ
===============
नुकत्याच काही महीन्यापुर्वी विधानसभेच्या निवडणुका राज्यात पार पडल्या.आता गावागावातील मिनी मंत्रालय असणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होत आहे.तासगाव तालुक्यातील ऑक्टोंबर अखेर मुदत असणार्या सर्व ग्रामपंचायतीचे प्रभाग आरक्षण प्रत्येक गावागावात नुकतेच पार पडले.तासगाव पुर्वभागातील एक प्रमुख बाजारपेठेचे गाव म्हणुन परीचीत असणार्या सावळज ग्रामपंचायतीच्या आगामी 2015 निवडणुकीचे प्रभाग आरक्षण सोडत महसुल विभागाच्या वतीने मोठ्या उत्सात पार पडल्या.
दरम्यान केंद्र सरकारने महीलाना 50% आरक्षण जाहीर केल्यानंतर प्रथमच होवु घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग आरक्षणात बर्याच दिग्गज इछुकांचा पत्ता कट झाल्याचेच दिसुन येत आहे.
      सावळज ग्रामपंचायतचे एकुण 6 प्रभाग असुन सदस्य संख्या 17 आहे.गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 6 महीला व 11 पुरुष सदस्यसंख्या होती.पण नव्या 50%महीला आरक्षण धोरणानुसार यावेळी सावळज ग्रामपंचायतीमध्ये 9 महीलाना व 8 पुरुष सद्स्याना  संधी मिळणार आहे.सावळज ग्रामपंचायतीचे 2015 निवडणुकीसाठीचे प्रभाग आरक्षण पुढील प्रमाणे ..
सावळज ग्रामपंचायत निवडणुक 2015 प्रभाग आरक्षण
=====================
प्रभाग  क्र.1=ओबीसी महीला +सर्वसाधारण महीला +सर्वसाधारण पुरुष
------=-=---============
प्रभाग  क्र.2=सर्वसाधारण पुरुष 2
==================
प्रभाग क्र.3= ओबीसी महीला +सर्वसाधारण महीला+सर्वसाधारण पुरुष
==================
प्रभाग  क्र.4=ओबीसी महीला +सर्वसाधारण महीला +सर्वसाधारण पुरुष
===================
प्रभाग  क्र.5=अनुसुचीत महीला +ओबीसी पुरुष+सर्वसाधारण महीला
=======================
प्रभाग क्र.6=ओबीसी पुरुष +अनुसुचीत महीला+ अनुसुचीत  पुरुष
===================
वरील प्रभाग आरक्षणमुळे अनेक इछुकांचे पत्ते कट झाले आहेत.अनेक प्रभागात महीला उमेदवार हुडकावे लागणार आहेत.तर काही प्रभागात उमेदवारी देताना स्थानिक नेत्यांची पंचाईत होणार असच चित्र आहे.
 दरम्यान सावळज हे राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील गाव असुन येथील स्थानिक राजकारणाचा आसपासच्या बहुतांशी गावात व तालुक्याच्या  राजकारणात बराच दबदबा आहे.माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यानीही  पण याच सावळज जिल्हापरीषद मतदार संघातुन आपली राजकीय कारकिर्दस सुरुवात केली होती.त्यामुळे सावळज गाव हे महत्वपुर्ण गाव आहे.गावामध्ये आजपर्यन्त आर.आर.पाटील यांच्याच गटाची सत्ता ग्रामपंचायतीवर निर्विवाद आहे.
 दरम्यानच्या काळात राजकीय पुलाखालुन बरचस पाणी वाहुन गेल आहे.गावागावातील कुरघोड्यांच्या राजकारणामुळे आज सावळज जिल्हापरीषद मतदार संघात सर्वकाही अधांतरी असल्याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा  निवडणुकीत दिसुन आला आहे.आर.आर पाटीलानी कोट्यावधी रुपयांचे विकासनिधी देवुनही गावागावात लोकांची नाराजी स्पष्टपणे मतदानातुन दिसुन आली आहे.
सावळज गाव हे मा.गृहमंत्र्याचे होमपीच असताना ही त्याना विधानसभेला फक्त 98 मतांची नाममात्र आघाडी मिळाली होती.
या सर्वबाबींचा विचार करत आगामी काळात मतदार संघात होवु घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार हे मात्र नक्की.

सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा
======================
2015 ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असुन यावेळी सरपंच पदाचे आरक्षण कोणते लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.सध्या सावळज ग्रामपंचायत सरपंच पद हे सर्वसाधरण महीलेसाठी आरक्षीत आहे.2015 साठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण पडावे यासाठी अनेकानी देव पाण्यात ठेवले आहेत.एकुणच  यावेळच्या ग्रामपंचायत निवड्णुक अभुतपुर्व चुरशीची होणार असेच चित्र दिसत आहे.